Tuesday, June 2, 2026
HomeJobपोलीस भरती लेखी परीक्षेमुळे चंद्रपुरात वाहतुकीत बदल

पोलीस भरती लेखी परीक्षेमुळे चंद्रपुरात वाहतुकीत बदल

Traffic Changes in Chandrapur Due to Police Recruitment Written Exam

चंद्रपूर :- चंद्रपूर पोलीस आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा रविवारी दि. १५ मार्च २०२६ रोजी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय Rajiv Gandhi Engineering College Chandrapur येथे आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांतील पात्र उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी काही मार्गांवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. Traffic Changes in Chandrapur Due to Police Recruitment Written Exam

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लालपेठ टी-पॉईंट चौक ते जुना बी.एन.आर. चौक या मार्गावरील संपूर्ण रस्ता सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार गरज भासल्यास या कालावधीत वाहतूक पूर्णतः थांबवण्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
१) बल्लारपूरकडून चंद्रपूर शहरात येणाऱ्या वाहनांसाठी :
कामगार चौक – चंद्रपूर-बल्हारशा हायवे रोड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – बागला चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच लालपेठ एरिया हॉस्पिटल – पठाणपुरा गेट मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुल हा मार्गही उपलब्ध राहणार आहे.

२) चंद्रपूर शहरातून बल्लारपूर हायवे रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :
बागला चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – बल्हारपूर हायवे रोड हा पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पार्किंगची व्यवस्था
लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांनी तसेच त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांनी आपली वाहने लालपेठ परिसरात किंवा डी.एड. कॉलेज उड्डाण पुलाखालील जागेत पार्क करावीत.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक नियोजनाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पडू शकेल.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular