Bandu Dhotre’s Hunger Strike Against the Lohardongri Mining Project Concludes
चंद्रपूर :- लोहारडोंगरी खाण प्रकल्पाच्या विरोधात इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर सुरू केलेला अन्नत्याग सत्याग्रह अखेर आज (दि. १४) समाप्त झाला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उइके यांच्या उपस्थितीत धोतरे यांनी आपला नऊ दिवसांपासून सुरू असलेला अन्नत्याग सत्याग्रह आज सोडला. Bandu Dhotre’s Hunger Strike Against the Lohardongri Mining Project Concludes
लोहारडोंगरी परिसरातील प्रस्तावित खाण प्रकल्पामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच पर्यावरणाचे नुकसान होणार असून स्थानिक नागरिक, वन्यजीव तसेच परिसरातील गावांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत बंडू धोतरे यांनी आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या सत्याग्रहाला विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून पाठिंबा मिळत होता.
आज पालकमंत्री डॉ. अशोक उइके यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित मागण्यांबाबत शासन पातळीवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर बंडू धोतरे यांनी आपला अन्नत्याग सत्याग्रह सोडला.
यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.