Saturday, April 26, 2025
HomeAssembly Electionसामाजिक संदेश देत धोपटाळा ते रायगड धावणार आयुष टेकाम

सामाजिक संदेश देत धोपटाळा ते रायगड धावणार आयुष टेकाम

Ayush Tekam will run from Dhoptala to Raigad giving social message

चंद्रपूर :- देशात आणि महाराष्ट्रातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार दूर व्हावेत, सर्व धर्म समभाव वृद्धिंगत, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, शेतकर्‍यांना सुख समृद्धी लाभावी इत्यादी सामाजिक संदेश घेऊन धोपटाळ्याचा आयुष टेकाम गुरूदेव चौक, गुरुदेव नगर, धोपटाळा ते रायगड अशी दौड पुर्ण करून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जावून नतमस्तक होणार आहे. Run for giving Social Message

तो दररोज ४० किलोमीटरवर धावणार असून त्याच्या सोबत बाईकवर नकुल सुक्रू धुर्वे हा युवक असणार आहे.

आज २ आक्टोंबर गांधी जयंतीचे Mahatma Gandhi Jayanti औचित्य साधून या उपक्रमाला सुरवात झाली. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी हिरवा झेंडा दाखवून त्याच्या या उपक्रमाला यश मिळावे अशा शुभेच्छा देऊन त्याला शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रवाना केले. MLA Subhash Dhote has shown the green flag and wished him well

यावेळी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर च्या नगराध्यक्षा सविताताई टेकाम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी जि. प. सदस्य संतोष चन्ने, महिपाल मडावी, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, सरपंच मैनाबाई नन्नवरे, उपसरपंच राजकूमार पाटील, ग्रा. प. सदस्य छाया वैद्य, संगिता हिवराळे, दिपक झाडे, आकाश दासर, श्रीधर रावला, प्रणाली जुलमे, मधुकर झाडे, अनंता एकडे, रमेश रणदिवे, रमु कमटम, भाऊराव इटणकर, संदीप नन्नवरे, हारून शेख यासह धोपटाळा येथील स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular