New Executive of Nima Chandrapur Branch
Election of Dr Deepak Bhattacharya as President
चंद्रपूर :- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डाॅक्टरांच्या संघटनेची वार्षिक आमसभा नुकतीच स्थानिक एन डी हाॅटेल येथे पार पडली. चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांची या आमसभेस विशेष उपस्थिती होती तसेच ज्येष्ठ निमा सदस्य डॉ वामन वराटे यांच्या अध्यक्षतेखाली हि आमसभा पार पडली. National Integrated Medical Association (NIMA)
सर्वप्रथम आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर आमदार जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी निमा सदस्यांसोबत संवाद साधला व महाकाली महोत्सवाचे सर्व डॉक्टरांना निमंत्रण दिले. निमाचे सदस्य डॉ नितीन बिश्वास यांना पिएचडी पदवी बहाल झाल्याबद्दल त्यांचा आमदार जोरगेवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
मावळते सचिव डॉ अमित कोसुरकर तसेच मावळते कोषाध्यक्ष डॉ मंगेश भरडकर यांनी आपला अहवाल सादर केला तसेच मावळते अध्यक्ष डॉ जितेंद्र खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Dr Deepak Bhattacharya as President
त्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, त्यात सर्वानुमते अध्यक्ष पदी डॉ दिपक भट्टाचार्य, सचीव पदी डॉ शरद रणदिवे, कोषाध्यक्ष पदी डॉ नितीन बिश्वास, उपाध्यक्ष पदी डॉ विजय भंडारी व डॉ रूपाली ऊत्तरवार, संयोजक पदी डॉ वैभव अडगुरवार, सहसचिव पदी डॉ रविकुमार चिंतावार व डॉ दिपाली चिंतावार, उपसचिव पदी डॉ मनोज गेडाम व डॉ सचीन कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ मनोहर लेनगुरे व डॉ बाबा दानव यांनी काम पाहिले.
चंद्रपूरातील सुप्रसिद्ध पॅथाॅलाॅजीस्ट डॉ ओमप्रकाश बोबडे यांच्या उपयुक्त व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास निमा चंद्रपूर शाखेचे डॉ प्रदिप मोहुर्ले, डॉ मेघराज चंदनानी, डॉ भुपेंद्र लोढिया, डॉ विनोद चौधरी, डॉ यशवंत सहारे, डॉ गजानन राऊत, डॉ सुधीर मत्ते, डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे, डॉ राजीव धानोरकर, डॉ रमेश यामसनीवार, डॉ सिमला गाजर्लावार, डॉ मनिषा घुगल तसेच शंभराच्या वर निमा सदस्यांची उपस्थिती होती.
