Arrest of the accused in Korpana torture crime
चंद्रपूर :- कोरपना येथील खासगी शाळेमध्ये इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पिडीत मुलगी आरोपीकडे दर रविवारी खासगी शिकवणीसाठी जात होती. त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची माहिती Abuse of a minor girl आपल्या पालकांना दिल्याने पालकांनी कोरपना पोलीस स्टेशनला जावून सदरची माहिती दिल्यानंतर तात्काळ आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व लगेच पिडीतेस वैद्यकिय तपासणीकरीता जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. Chandrapur Police अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला LCB प्राप्त होताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवून तात्काळ दोन पथके तयार करून आरोपीचे शोधकामी रवाना केले. सामाजिक संदेश देत आयुष धावणार राजूरा ते रायगड
आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच अकोला येथे एक पथक रवाना होवून मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी अमोल विनायक लोडे, वय 28 वर्ष, रा. कोरपना, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपुर यांस रात्री दरम्यान अकोला येथील बस स्थानकातुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुरं यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोहवा. धनराज करकाडे, नितेश महात्मे, जयंत चुनारकर, दिनेश आराडे, पोशि. मिलींद टेकाम स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.