Friday, April 17, 2026
HomeEducationalकमलादेवी शिक्षण महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन

कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन

Personality development workshop organized at Kamaladevi College of Education

चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी बाई, चंद्रपूर येथे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाने प्राचार्य डॉ. हेमकांत बाकडे व प्रमुख मार्गदर्शक मा. वी. दिपक ब्यास सर बजाज यद्रपूर तंत्रनिकेतन, बंदपुर यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापिका शमिना अली उपस्थित होते. Personality development workshop organized at Kamaladevi College of Education

महाकाली मंदिर परिसरात 51 फूट ध्वजाचे भव्य ध्वजारोहण

सदर कार्यक्रमात मार्गदर्शकांनी बी. एड. अभ्यासक्रमातील प्रथम वर्षीय छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांना व्यक्तिमत्व विकासामध्ये बदल घडविण्यासाठी ध्येय, संयम, आत्मविश्वास, संवाद कौशल्ये, लक्ष्य निर्धारण, बेठ व्यवस्थापन, अनुकूलन, संघर्ष याद्वारे व्यक्ती परिवर्तन घडवून आणू शकतो. तसेच जीवनात होणाऱ्या चुकांमधूनच व्यक्ती शिकत असतो आणि विविध प्रकारच्या संधी प्राप्त करू शकतो व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विविध खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा पढविला जातो असे उदाहरणासहित समजावून सांगीतले.

बँकेत मराठी भाषेचा वापर करा, मनसे आक्रमक

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे सर यांनी असे सांगीतले की विध्यार्थ्यानी आपला व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी स्वतः मध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, तसेच यशस्वी होण्यासाठी इतरांची तुलना करू नये त्याच बरोबर सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन असणे गरजेचे आहे याबाबत माहिती दिली.

WCBTRL कंपनीवर गुन्हे दाखल करा

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका शमिना अली यानी केले. सूत्रसंचालन बी. एड. प्रथम वर्षीय छात्राध्यापिका प्रियका चिवडे व आभारप्रदर्शन छात्राध्यापिका कु. वैभवी महावी यांनी केले तसेच एम.एड. प्रथम वर्षीय छात्राध्यापिका आकांशा मडावी यानी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेबद्दल आपला अभिप्राय दिला.

प्राध्यापिका सुचिता खोब्रागडे, प्राध्यापिका अश्विनी सातपुडके, प्राध्यापिका बनिता हलकरे, प्राध्यापिका डॉ. प्रगती यच्चूवार, प्राध्यापिका डॉ. जयमाला पारे, प्राध्यापक राजकुमार भगत, ग्रंथपाल चंदन जगताप, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोरेश्वर गाउत्रे तसेच बी.एड. प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular