Bank signboard should be in Marathi and use Marathi language
चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोजगार स्वयंम रोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरातील सर्व बँकांना बँकेतील फलक मराठी भाषेत लावावा तसेच बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, MNS मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा ईशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. Bank signboard should be in Marathi and use Marathi language
मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, मनसे आक्रमक
महाराष्ट्रात आस्थापनामध्ये बँकांमध्ये संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर खूप कमी प्रमाणात केल्या जातो ही खेदाची बाब आहे. महाराष्ट्रात बँकेचे फलक स्पष्ट मराठी भाषेत असावे, प्रत्येकाला मराठी भाषा येणे बंधनकारक आहे, तरीही बँकांमध्ये परप्रांतीय कर्मचारी आहेत ज्यांना मराठी समजतात परंतू ते मराठी बोलत नाही त्यामुळे बँकांमध्ये येणारा जो मजूरवर्ग असतो, त्यांना हिंदी बोलता येत नाही त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो व बँकेतील कर्मचारी त्यांच्याशी खूप उद्धटपणे वागतात.

बँकेत येणाऱ्या ग्राहकांना स्पष्ट बोलतात ‘मुझे मराठी आती नही, तुमको हिंदी आती है तो बात करो’ त्यामुळे ज्यांना हिंदी येत नाही त्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. बँकेत येणाऱ्या कोणत्याही ग्राहकांना असा त्रास होऊ नये याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंदपुरमधील प्रत्येक बँकांना मराठी भाषा ही बँकांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला आलीच पाहिजे त्याकरिता निवेदनामार्फत पत्र दिले आहे.
ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व येथून चालते व्हावे, महाराष्ट्रात राहून मराठी भाषा येत नाही, हा मराठी भाषेचा अपमान आहे आणि तो अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही त्यामुळे सर्व आस्थापन बँका येथील कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येणे बंधनकारक आहे आणि त्यांनी बँकेमध्ये मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले.Otherwise MNS style agitation
यावेळी मनोज तांबेकर जिल्हा अध्यक्ष रोजगार स्व्यम रोजगार विभाग चंद्रपूर, किशोरभाऊ माडगूळवार जिल्हा सचिव चंद्रपूर मनसे, राज वर्मा जिल्हा उपाध्यक्ष रोजगार स्वयं रोजगार विभाग चंद्रपूर, संदीप पटेल शहर संघटक रोजगार स्वयं रोजगार विभाग, वर्षा भोमले शहर अध्यक्ष महिला सेना, मंदाताई कऱ्हाडे शहर उपाध्यक्ष महिला सेना चंद्रपूर, शिवराज सिंघ चौहान सह समस्त मनसैनिक उपस्थित होते.