4 accused arrested for online extortion by stopping them on the road
चंद्रपूर :- चंद्रपूर – भद्रावती राज्य मार्गावर दोन अल्पवयीन बालकांसह 4 आरोपीने दुचाकीने जाणाऱ्या व्यक्तीला अडवून ऑनलाईन लुटपाट केली व त्या रक्कमेतून नवीन कपडे घेतले. पडोली पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अवघ्या 24 तासात दोन अल्पवयीन बालकांसहित 4 आरोपींना अटक केली. आरोपी रुषीकेश आंबोलकर, अनुज महाजन असे आरोपींचे नाव आहे. 4 accused arrested for online extortion by stopping them on the road
दिनांक 16 जुन 2025 रोजी रात्रौ 12:45 वाजता सुमारास उमेश महंत शहा (50) रा. भद्रावती हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर भद्रावती राज्य महामार्गावरुन भद्रावतीला जात असतांना साखरवाही फाट्याजवळ फिर्यादीचे दुचाकीला मागेहून येणाऱ्या दुचाकीवर 4 अनोळखी इसमांनी अडवुन फिर्यादीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेवुन त्या मोबाईल मधुन 91 हजार रुपये अज्ञात इसमाच्या नावाने ट्रॉन्सफर केले.
फिर्यादी उमेश शहा यांनी घटनेची पडोली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली, पो.स्टे. पडोली येथे अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हाय-वे वरील जबरीचोरीच्या गुन्हयाचे गांभीर्य पाहता पडोली पोलीसांनी अज्ञात मोटार सायकलस्वार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गोपनिय बातमीदार व तांत्रिक दृष्ट्या तपास करून अवघ्या 24 तासात सदर गुन्ह्यात दोन विधीसंघर्ष बालकासह आरोपी रुषीकेश आंबोलकर, अनुज महाजन यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. Padoli Police Station take action within 24 hours
आरोपीकडुन रोख 44 हजार रुपये, एक होंडा शाईन मोटार सायकल किंमत 1 लाख रुपये, चोरलेल्या पैशातुन खरेदी केलेले कपडे किंमत 13 हजार 300 रुपये आणि एकुण 4 नग मोबाईल किंमत 31 हजार रुपये असे एकुण 2 लाख 8 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोहवा विनोद वनकर, पोअं. कोमल मोहजे, प्रतिक हेमके, धिरज भोयर, मपोअं सुचीता उमरे सर्व पोस्टे पडोली यांनी केली.