Monday, August 17, 2026
HomeCrimeमहावितरणचा वीजचोरांना दणका

महावितरणचा वीजचोरांना दणका

चंद्रपूर :- महावितरणने राज्यभरात वीजचोरी विरोधात सुरू केलेली धडक मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल १९ हजार ५९९ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये केवळ जुलै महिन्यातच ११ हजार ३२ प्रकरणांचा मोठा पर्दाफाश झाला आहे. MSEDCL cracks down on power thieves >> चंद्रपूर पोलिसांची दमदार कारवाई 3 कोटी 59 लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन

महावितरणच्या तपासणीत थेट वीजवाहिन्यांना हूक लावून वीज घेणे तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची १५ हजार ९६५ प्रकरणे समोर आली आहेत. या कारवायांमधून एकूण ३० कोटी ३६ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी आतापर्यंत ६ हजार ६२९ ग्राहकांनी १४ कोटी १२ लाख रुपये भरले आहेत. भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…….

विभागनिहाय आकडेवारीनुसार जुलै महिन्यात कोकण विभागात सर्वाधिक ४ हजार ८४ वीजचोऱ्या उघड झाल्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात २ हजार ३६५, नागपूर विभागात २ हजार ३२४ आणि पुणे विभागात २ हजार २५९ प्रकरणांचा समावेश आहे. आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश……

वीजचोरीची रक्कम दंडासह मुदतीत न भरल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. या कायद्यानुसार दोषींना दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही महावितरणने दिला आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular