OBC Mandal Yatra welcomed by Young Chanda Brigade
Distribution of soft drinks to the community members participating in the yatra
चंद्रपूर :- 3 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथून निघालेली ओबीसी मंडळ यात्रा रविवारी चंद्रपूरात पोहोचली. यावेळी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मंडळ यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळ यात्रेत सहभागी नागरिकांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणे, आशा देशमुख, अनिता झाडे, अस्मिता डोणाकर, वंदना हजारे, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसैन, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, देवा कुंटा, कार्तिक बोरेवार, दुर्गा वैरागडे, कल्पना शिंदे, विमल काटकर, कौसर खान, अल्का मेश्राम आदींची उपस्थिती होती. OBC Mandal Yatra welcomed by Young Chanda Brigade
चंद्रपूर, ओबीसी अधिकार युवा मंच, संघर्ष वाहिनी, अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती वेलफेअर संघ आणि इतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी मंडळ यात्रेचे Mandal Yatra आयोजन करण्यात आले होते. 3 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथून या जनजागृती यात्रेची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, काल रविवारी सदर यात्रा चंद्रपूरात दाखल झाल्यानंतर गांधी चौकातील हसन इलेक्ट्रॉनिक जवळ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि यात्रेत सहभागी समाज बांधवांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले.