Extend the benefit of government schemes to the last element: MLA Subhash Dhote.
The department interacted with the citizens of Virur station regarding the revenue fortnight.
महसूल पंधरवडय़ानिमित्य विरूर स्टेशन येथील नागरिकांशी विभागाने साधला संवाद.
चंद्रपूर :- तहसील कार्यालय राजुरा च्या वतीने विरूर स्टेशन येथे महसुल दिनाचे औचित्य साधून महसुल पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते म्हणाले की शासन आणि लाभार्थी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल विभाग भुमिका पार पाडत असतात. सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. मात्र अनेकदा विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील अगदी शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यासाठी महसुल विभागाने अधिक परिश्रम घेण्याची गरज असून घरकुल योजना, निराधार योजना, आनलाईन पीकविमा, लाडली बहीण, वयोवृद्धांच्या योजना व अन्य योजनांसाठी गोरगरीब जनता सर्व्हर डाऊन तसेच विविध तांत्रिक अडचणीमुळे त्रस्त आहेत यावर तोडगा काढून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, विरूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष वाकडे, कृषी मंडळ अधिकारी चेतन चव्हाण, पशु वैद्यकीय अधिकारी तेलंग, कृ. उ. बा. स. संचालक सविता अजय रेड्डी, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, आकेवार जी, सुरेश पावडे, अजय रेड्डी, सरपंच अनिल आलाम, सरपंच सुरेखा आत्राम, उपसरपंच प्रीती पवार, कल्याणी गेडाम, धनराज चिंचोलकर, अरूण सोमलकर, अंबादास भोयर, भाऊजी जाभोर, बबन ताकसांडे, सुधाकर पेंदोर, रामभाऊ ढुमणे, चेतन जयपूर, प्रवीण चिडे, ज्ञानेश्वर मोरे, संभाशिव नागापुरे, नानाजी ढवस, लटारू नारनवरे, यासह अनेकांची उपस्थिती होती.
दरम्यान आ. सुभाष धोटे यांनी वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राजुरा तालुक्यातील मौजा चिचबोडी आणि परिसरातील पुर आणि अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांची पाहणी केली आणि संपूर्ण विरूर स्टेशन परिसरातील सतत पडणाऱ्या पावसामुळे उभ्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.