Incident in Kolkata is a blow to humanity – MLA Kishore Jorgewar
चंद्रपूर :- कोलकाता येथील डॉक्टर वर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महिला सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना केवळ एका महिलेवर झालेला हल्ला नाही, तर संपूर्ण मानवतेवर झालेला आघात आहे. अशा क्रूर आणि अमानवी कृत्यांचा सर्व स्तरांवर निषेध केला गेला पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी दिली आहे. Incident in Kolkata is a blow to humanity
महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणारी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणारी यंत्रणा उभी करणे आज काळाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार कडे पाठपूरावा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
समाजातील प्रत्येकाने यासाठी आवाज उठवावा, अन्यायाला विरोध करावा आणि आपापल्या परीने महिलांच्या सन्मानाची आणि सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी आमची ठाम मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारा विरोधात प्रतिक्रिया देतांना ते बोलत होते.