Thursday, March 5, 2026
HomeJobप्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी खा. प्रतिभा धानोरकर आक्रमक

प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी खा. प्रतिभा धानोरकर आक्रमक

MP Pratibha Dhanorkar’s aggressive stance for jobs for Gowri Pauni project victims

चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक आयोजित करण्याची प्रत्राद्वारे मागणी केली आहे. MP Pratibha Dhanorkar’s aggressive stance for jobs

गोवरी – पौनी विस्तार योजनेमुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासारख्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

चंद्रपुरात भरदिवसा चोरी, सोने चांदीचे दागिने जप्त

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या विस्तृतपणे मांडल्या आहेत. यात प्रामुख्याने नोकरी संबंधीची प्रलंबित फाईल त्वरित मंजूर करणे, सर्व पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे, अधिग्रहित जमिनीच्या ठिकाणीच नोकरी उपलब्ध करणे आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी सामावून घेणे, शेतकऱ्यांशी चर्चा करताना वेकोलीच्या उच्च अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे, SOP चा मुद्दा रद्द करणे, कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथील जमीन संपादन आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, तसेच सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर आणि वेकोलीच्या खाणकामामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीही खासदार धानोरकर यांनी केली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आणि वेकोलीच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन खासदार धानोरकर यांनी दिले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular