Thursday, March 5, 2026
HomeCrimeशहरात भरदिवसा चोरी : शहर पोलीसांनी केले सोने चांदीचे दागिने जप्त

शहरात भरदिवसा चोरी : शहर पोलीसांनी केले सोने चांदीचे दागिने जप्त

Theft in broad daylight in Chandrapur

शहरात भरदिवसा चोरी

शहर पोलीसांनी घेतले बालकाला ताब्यात

चंद्रपूर :- शहरातील घुटकाळा परिसरात भरदिवसा दुपारी चोरी झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलिसांना प्राप्त झाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता चोरी करणारा विधीसंघर्ष बालक आढळून आला, त्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याचेकडून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने असा एकूण 2,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Theft in broad daylight in Chandrapur

शहरातील घुटकाळा परिसरातील श्रीमती विभा क्षीरसागर या दुपारी आपल्या घरी आराम करत असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून आलमारीतील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. Chandrapur City police seize gold and silver ornaments

भरदिवसा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झाल्याची घटना गांभीर्याची असल्याने पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख पो.उपनि. संदीप बच्छिरे पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली दरम्यान तपासाची चक्रे फिरवीत तांत्रिक माहितीच्या आधारावर एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच पुन्हा एका घरी चोरी केल्याची कबुली दिली, त्याचेकडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur Crime

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि प्रभावती एकुरके चंद्रपूर शहर, पोस्टे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि संदिप बच्छिरे, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, कपुरचंद्र खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रूपेश रनदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, सारीका गौरकर, दिपीका झिंगरे यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular