Wednesday, September 2, 2026
HomeMaharashtraवर्धा पॅसेंजरची वेळ बदला, नवी 'इंटरसिटी' सुरू करा

वर्धा पॅसेंजरची वेळ बदला, नवी ‘इंटरसिटी’ सुरू करा

चंद्रपूर : चंद्रपूर-विदर्भ भागातील प्रलंबित रेल्वे प्रश्न, उड्डाणपुलांची व अंडरपासची कामे आणि प्रवाशांच्या सोयी – सुविधांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव व विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार बंटी साहू, खासदार अमर काळे, खासदार अनिल बोंडे, खासदार दुर्गादास उईके, खासदार अनुप धोत्रे, खासदार स्मिता वाघ व खासदार बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडलेल्या सर्व प्रमुख मागण्यांवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत हे विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

रेल्वे प्रशासनाने मे २०२६ मध्येच मंजूर केलेल्या परंतु अद्याप प्रत्यक्षात सुरू न झालेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह या थेट मुंबई एक्सप्रेसला तात्काळ सुरू करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लावून धरली. याशिवाय, हि रेल्वे लवकर सुरु करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

आठवड्यातून १ दिवस चालणारी पुणे – काजीपेठ ट्रेन आता २ दिवस सुरु करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी वर्धा पॅसेंजरची वेळ सकाळी ६:३० ऐवजी ७:४० वाजता करून विदर्भ व दुरंतो एक्सप्रेससाठी कनेक्टिंग सेवा उपलब्ध होणार आहे, नागपूर – बल्लारपूर नवी ‘इंटरसिटी एक्सप्रेस’ सुरू होणार आहे, नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये ४ अतिरिक्त कोच वाढवून तिला ‘सुपरफास्ट’ दर्जा देणे आणि कोविड काळात बंद पडलेल्या गाड्या पूर्ववत सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. Reschedule the Wardha Passenger; Introduce a New ‘Intercity’ Train

क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर जोर देताना अहिल्यानगर आणि वंदे भारत एक्सप्रेसला वरोरा येथे अधिकृत थांबा देण्यास मंजुरी दर्शवण्यात आली आहे. तसेच वरोरा व भद्रावती शहरातील अंडरपास, विरूर ते खांबाडा येथे नवीन अंडरपास आणि वणी, चिखलगाव, नागरी-हिंगणघाट (गेट क्र. १९) व भद्रावती ते विजासन येथील उड्डाणपुलांच्या संथ गतीने चाललेल्या कामांना गती देण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले. यासोबतच ढोरवासा – तेलवासा रस्त्याची दुरुस्ती करणे आणि मांजरी रेल्वे गेट वारंवार बंद असण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करण्याचे प्रशासनाने मान्य केले.

सामाजिक व मानवतावादी दृष्टिकोन ठेवून वरोरा येथील मीनाक्षी बोनसुल व त्यांच्या कुटुंबाला मानवतावादी आधारावर निवास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच रेल्वे जमिनीवरील सर्व जुन्या अतिक्रमणधारकांना घरे देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन धोरण राबवण्याचे आश्वासन देण्यात आले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करून प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ सुविधा देण्याचे आश्वासन दिले असून सर्व प्रलंबित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील असे स्पष्ट केले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular