Two more swords seized in Chandrapur: LCB action
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील लखमापूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकीत 2 धारदार तलवारी जप्त करण्यात आली. Chandrapur Crime
शहरातील तसेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी विशेष मोहीम राबवित अनेक गुन्हेगारांकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. Local Crime Branch
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर सापळा रचून लखमापूर येथील मनोहर उर्फ दादू शत्रुघ्न निर्मलकर याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करीत त्याच्या घराची झडती घेतली असता घरात दोन नग लोखंडी धारदार तलवार असा एकूण 2000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Two more swords seized in Chandrapur
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात, महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात पो.हवा नितीन साळवे, सुभाष गोहोकार, प्रकाश बलकी, पोशी मिलिंद जांभुळे, चापोशी मिलिंद टेकाम तसेच सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.