MP Pratibha Dhanorkar felicitated on behalf of Sakal Kunbi Samaj will always be grateful to the community – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- समाजातील सर्व घटकांनी मला सहकार्य केल्याने, मी आज या पदावर विराजमान झाली आहे. सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नसल्याची भावना खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी चंद्रपूर व मुल येथील सकल कुणबी समाजाच्या सत्कारावेळी व्यक्त केली.
मला समाजातील सर्व घटकांनी मदत केली आहे. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निवडणूकीच्या वेळी देखील लोकसभा क्षेत्रातील इतर समाजासह कुणबी समाजाने प्रामुख्याने महत्वाची भुमीका बजावल्याने दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर व मी स्वतः या पदावर विराजमान झाले. त्यामुळे मी समाजाचे सदैव आभारी राहणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात आयोजित सत्काराच्या वेळी केले. MP Pratibha Dhanorkar felicitated on behalf of Sakal Kunbi Samaj