BSP protest in Chandrapur against sc st reservation classification
चंद्रपूर :- देशभरात बुधवार दिनांक 21ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भारत बंदच्या या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी सहभागी झाली आहे. चंद्रपूर बसपा च्या वतीने एस सी एस टी आरक्षण वर्गीकरण रद्द करण्याचा निषेध करीत मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले,>> भारत बंद… चंद्रपुरात बसपा चे आंदोलन
SC/ST आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता. एससी एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली. BSP protest in Chandrapur against sc st reservation classification
आज देशभरात विविध संघटनाच्या माध्यमातून बंद पुकारण्यात आला, चंद्रपुरात बसपा जिल्हाध्यक्ष शिरीष गोगूलवार यांच्या नेतृत्वात शांतीपूर्व आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार संसदेत आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून संसदेत सर्वपक्षीय एक विशेष बैठक बोलावून एका नव्या कायद्याची आखणी करण्यात यावी. या कायद्याला संविधानाच्या यादीमध्ये समाविष्ट करत त्याला संरक्षित करून घ्यावं. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करून सदर निर्णय रद्द करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार एससी, एसटी आणि ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना संरक्षण देण्यात यावं अशी विशेष मागणी आहे.