Action by local crime branch against unmedied prohibited flavored tobacco seller in Ballarpur
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने बल्लारपूर येथील अवैध प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर Police Raid धाड टाकत 53,819 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी निरज शाह विरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला. prohibited flavored tobacco seized
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी LCB स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. बल्लारपूर हददीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, नीरज शाहू, आंबेडकर वार्ड, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर हा कीरायची खोली घेऊन त्या ठिकाणी अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुचा साठा करुन ,बाळगुन विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन आरोपीचे किरायाचे घरी छापा टाकला असता सुगंधीत तंबाखुचा साठा आढळून आला. असा एकुण 53,819/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Local Crime Branch
आरोपी विरुध्द पो.स्टे. बल्लारपूर येथे अपराध क्रमांक 962 /2024 कलम 223, 275, 123 भा.न्या.सं.2023 सहकलम 30 (2) 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur Crime
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि. दीपक काँक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले,पो हवा. किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावर, सतीश अवतरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली.



