Ballarpur police seized 4 accused along with 2 guns
चंद्रपूर :- बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे 2 देशी बनावटीचे बंदूक जप्त करीत 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
दिनांक 13 ऑक्टोबर रोजी बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील फुकटनगर येथील कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी याचे घरी गोपनीय माहितीवरून धाड टाकत घराची झडती घेतली असता एक जुने वापरती लोखंडी धातूचे देशी बनावटीचे सिंगल बॅरल व खाली मॅगजीन असलेले 7 एम एम पिस्तूल (अग्निशस्त्र) आढळून आले यावरून आरोपीवर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. Ballarpur police seized 4 accused along with 2 guns
तसेच दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त खबरेवरून आकाश बाबूराव चाफले (24 वर्ष), प्रणय मारोती जुनघरे (23 वर्ष) दोन्ही रा. सुब्बई, ता. राजूरा, जि चंद्रपूर तर पलविंदरसिंग चॉदसिंग बावरी, रा. कन्नमबाइ वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेवून आकाश बाबूराव चाफले याचे ताब्यातून कायदेशिर रितीप्रमाणे एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बोअर व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) 07 mm पिस्तूल किंमत 25,000 रुपये घटनास्थळून जप्त करून पो स्टे ला अप क 959/2024 कलम 7, 27 भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाहीत एकुण चार आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.
सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्शन, अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागिय पो. अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, स.पो.नि. ए.एस. टोपले, पो.उप.निरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूम, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो अंमलदार विकास खंदार, इत्याईी पो. स्टाफ यांनी अतिशय कुश्चलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.



