Organized Krishi Kumbh 2025 in College of Agriculture
चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या पर्वावर वार्षिक संमेलन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलागुणांना वाव देण्याकरिता दरवर्षी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या वतीने वतीने वार्षिक
संमेलनाचे आयोजन करण्यात येते. Krishi Kumbh 2025
यावर्षीच्या संमेलनाची संकल्पना होती. ‘कृषी कुंभ २०२५ – सोहळा सहा दशकांचा’ या अंतर्गत महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेत विविध स्पर्धांमध्ये बक्षीसे प्राप्त केली.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वरोरा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री रवि राठोड होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी स्थान भूषविले.
श्री रवी राठोड यांनी उत्तम भविष्या करिता कृषी च्या विदयार्थ्यांनी नवीन शैक्षणीक धोरणाला अनुसरून कृषी उदयोग पूरक कौशल्य आत्मसात करावी तसेच तारुण्यातील विजीगिषा वृत्ती सातत्याने जोपासावी असे आवाहन केले.
प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गेल्या सहा दशकांचा आढावा घेत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला तसेच , आंतर महाविद्यालयीन, विद्यापीठ स्तरीय अनेक स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वार्षिक संमेलना दरम्यान क्रिकेट, कबड्डी,खोखो, व्हॉलीबॉल , टेबल टेनिस ,बुद्धिबळ , बॅडमिंटन, संगीत खुर्ची, कॅरम इत्यादी क्रीडा स्पर्धा तसेच रांगोळी अंताक्षरी
प्रश्नमंजुषा, गायन, वादन, नृत्य, नाटक, काव्यवाचन, मुकनाट्य, फॅशन शो, उत्कृष्ट संचालन इत्यादी सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये वरील स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले तसेच आंतर महाविद्यालयीन तथा विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा जिमखाना प्रमुख राजेश रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध समित्यातील सहभागी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.



