Saturday, January 17, 2026
HomeCrimeप्रशांत कोरटकरांवर गुन्हा नोंदवून अटक करा

प्रशांत कोरटकरांवर गुन्हा नोंदवून अटक करा

Register a case and arrest Prashant Koradkar immediately

चंद्रपूर :- कोल्हापुरातील इतिहासतज्ञ श्री इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक आणि एकेरी भाषेचा वापर करणाऱ्या प्रशांत कोरटकर, नागपूर याच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवून अटक करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चंद्रपूर च्या वतीने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रासह समस्त भारत देशाचे आराध्य दैवत असून त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य शिवप्रेमी आहेत. दिनांक 25 फेब्रुवारीला मध्यरात्रीला प्रशांत कोरटकर यांनी इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांना मोबाईलद्वारे फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच संभाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य विधाने आणि भाषेचा वापर केला आहे.
.
याबाबीमुळे देशभरातील असंख्य शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या जातीयवादी माणसावर कठोर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा व तत्काळ अटक करण्यात यावी. तसेच या प्रशांत कोरटकर यांच्या मागे कोणत्या विकृत समाजविघातक शक्ती आहे त्याचा शोध घ्यावा अन्यथा असंख्य शिवप्रेमी त्याविरुद्ध तीव्र आवाज उचलणार अश्या आशयचे निवेदन चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष डॉ दिलीप चौधरी, शरद पवार विचार मंच चे जिल्हाध्यक्ष एड निमेश मानकर, छत्रपती महोत्सव समितीचे संतोष कुचनकर, सह्याद्री प्रतिष्ठान चे निशिकांत देशमुख, बाबाराव सातपुते, एड गजानन नागपुरे, चंद्रकांत वैद्य, विनोद थेरे आदींची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular