Kosurkar family’s inspiring act of preserving social consciousness
चंद्रपूर :- समाजात वाढत्या दिखाऊपणाच्या पार्श्वभूमीवर कोसुरकर कुटुंबाने सामाजिक भान जपत एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे. शहरातील सामाजिक कार्यात सहभाग घेणारे शिवा कोसुरकर यांच्या आजी स्वर्गीय पुष्पाबाई शेषरावजी कोसुरकर यांचे निधन २८ मार्च २०२५ रोजी झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अकरमास श्राद्धाचा कार्यक्रम पारंपरिक धार्मिक विधी टाळत व सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करण्यात आला.
कार्यक्रम सामाजिक भान लक्षात घेत, डेबू सावली वृद्धाश्रम, देवाडा येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसमवेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्धांना प्रेमाने भोजनदान देत त्यांच्या सहवासात हा दिवस अर्थपूर्ण व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आपलेपणाची भावना मिळाली. Food donation at Debu Savli old age home
कोसुरकर कुटुंबाने धार्मिक विधींवर खर्च करण्याऐवजी समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला, ही कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलता व कुटुंबाच्या मूल्यांची जपणूक होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

