Thursday, March 5, 2026
HomeCulturalकोसुरकर कुटुंबाची सामाजिक कृती

कोसुरकर कुटुंबाची सामाजिक कृती

Kosurkar family’s inspiring act of social awareness

चंद्रपूर :- समाजात वाढत्या दिखाऊपणाच्या पार्श्वभूमीवर कोसुरकर कुटुंबाने सामाजिक भान जपत एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे.

शहरातील सामाजिक कार्यात सहभाग घेणारे शिवा कोसुरकर यांच्या आजी स्वर्गीय पुष्पाबाई शेषरावजी कोसुरकर यांचे निधन २८ मार्च २०२५ रोजी झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अकरमास श्राद्धाचा कार्यक्रम पारंपरिक धार्मिक विधी टाळत व सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करण्यात आला. Kosurkar family’s inspiring act of social awareness

अकरमास कार्यक्रम डेबू सावली वृद्धाश्रम, देवाडा येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसमवेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृद्धाश्रमातील वृद्धांना प्रेमाने भोजनदान देत त्यांच्या सहवासात हा दिवस अर्थपूर्ण व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आपलेपणाची भावना मिळाली. Food donation to Debu Savli old age home

कोसुरकर कुटुंबाने धार्मिक विधींवर खर्च करण्याऐवजी समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला, ही कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलता व कुटुंबाच्या मूल्यांची जपणूक होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

यावेळी शिवा कोसुरकर (नातू), पूजा कोसुरकर (नातसून), किमया कोसुरकर (पणती), सुनीता कोसुरकर (सून) तसेच इतर नातेवाईक उपस्थित होते.

कोसुरकर कुटुंबाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून, समाजात सामाजिक जबाबदारीची भावना रुजविणारा हा आदर्श उपक्रम मानला जात आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular