Infant’s tradition of 100 percent results continues
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी शालांत परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या सत्र २०२४ – २०२५ च्या निकालात इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन करीत १०० टक्के निकाल देण्याची आपली परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. Infant’s tradition of 100 percent results continues
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून इन्फंट चा विद्यार्थी सम्यक कलदार हुमणे याने ९४.८०% गुणासह राजुरा तालुक्यातून प्रथम तर आदर्श राजेंद्र पचारे याने ९३. ४० % गुण घेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. Infant’s Samyak Humane English medium first in the Rajura taluka
तर कु. आस्मा परविन मन्झुर अली सय्यद हीने ९२ % गुणासह शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
इन्फंट चे एकुण ५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ७ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण, २५ विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये तर अन्य सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, संस्थेचे सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
