Tuesday, June 2, 2026
HomeForestखासदार प्रतिभाताई धानोरकर उद्या जिवतीत : नागरिकांच्या समस्यांवर करणार चर्चा

खासदार प्रतिभाताई धानोरकर उद्या जिवतीत : नागरिकांच्या समस्यांवर करणार चर्चा

MP Pratibha Dhanorkar’s Janata Darbar at Jiwati

 चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी, पंचायत समिती जिवती येथे एका महत्त्वपूर्ण जनता दरबारासह विविध विभागातील अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेणार आहे. सकाळी ठीक ११:०० वाजता या जनता दरबाराला Janta Darbaar सुरुवात होणार आहे.

जिवती तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने खराब रस्ते, वनहक्कांसंबंधी समस्या, अनियमित वीजपुरवठा आणि अपुऱ्या आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन केले आहे. MP Pratibha Dhanorkar will discuss the problems of citizens at Jivati ​​tomorrow

या जनता दरबारात खासदार प्रतिभाताई धानोरकर स्वतः नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना त्यांच्या समस्या व अडचणी थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर या समस्यांची नोंद घेऊन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणार आहेत.

या जनता दरबाराच्या आयोजनामागील मुख्य उद्देश हा जिवती तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाकडून त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करणे हा आहे. खासदार धानोरकर यांनी यापूर्वीही नागरिकांच्या समस्यांसाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत आणि हा जनता दरबार त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

तरी, जिवती तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्यांना आपल्या समस्या व अडचणी खासदार महोदयांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांनी उद्या सकाळी ११:०० वाजता पंचायत समिती जिवती येथे लेखी निवेदनासह भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करून उपस्थित राहावे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular