Monday, July 13, 2026
HomeEducationalखा. नामदेव किरसान यांचा पुस्तक वाटप उपक्रम 19 जुलैला

खा. नामदेव किरसान यांचा पुस्तक वाटप उपक्रम 19 जुलैला

MP Namdev Kirsan’s book distribution initiative on July 19

गडचिरोली :- गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान MP Namdev Kirsan यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, तो आता रविवार, 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुणे येथून गडचिरोलीकडे पाठविण्यात आली होती. मात्र, पुणे परिसरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने ही पुस्तके नियोजित वेळेत गडचिरोली येथे पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यक्रमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी पूर्वनोंदणी केलेले सर्व युवक-युवती, विद्यार्थी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुमानंद सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular