Friday, April 17, 2026
HomeAccidentकाळी पिवळी - ट्रक ची समोरा समोर धडक

काळी पिवळी – ट्रक ची समोरा समोर धडक

Fatal passenger auto-truck accident

चंद्रपूर :- मूल नागपूर मुख्य मार्गावरील चितेगाव जवळ प्रवासी वाहतूक करणारी टाटा मॅजिक (ऑटो) काळी पिवळीला समोरून धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकने सामोरा समोर धडक दिली, या भीषण अपघातात मॅजिक वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील 16 प्रवासी जखमी झाले. Fatal passenger auto-truck accident

सिंदेवाही वरुन मुलकडे प्रवाशी घेऊन निघालेली काळी पिवळी टाटा म्यजिक गाडी नंबर MH 34 U 2396 मुल – नागपूर मुख्य रस्त्यावर चितेगाव जवळ समोरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 BL 8524 च्या ट्रक चालकाने समोरा समोर धडक दिली या धडकेत काळी पिवळी टाटा मॅजिक मधील 16 प्रवाशी गंभीर जखमी झाले तर मॅजिक वाहनाचा चालक हा घटनास्थळी ठार झाला. भरधाव वेगाने येणारा ट्रक चालक हा दारुच्या नशेत होता असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

या अपघातातील गंभीर जखमींना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास मुल पोलिस करीत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular