Infant’s students excel in Interstate Karate Championship
चंद्रपूर :-इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांनी तेलंगणा राज्यातील करीमनगर मध्ये दिनांक ८ डिसेंबर २०२४ रविवारला आयोजित इंटरस्टेट कराटे चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत विविध मेडल्स प्राप्त केले. तसेच बालेवाडी पुणे येथे झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये सुद्धा पदके मिळवून कराटे मध्ये गगन भरारी घेतली आहे. Infant’s students excel in Interstate Karate Championship
करीमनगर तेलंगणा मध्ये झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये कु. स्वानंदी बुटले हीने ब्ल्यू बेल्ट कॅटेगिरी मध्ये गोल्ड मेड मेडल प्राप्त केले. कु. मनस्वी शेंडे हिने ब्राऊन बेल्ट कॅटेगिरी मध्ये गोल्ड मेडल. कु. जानवी सुनील मोहूर्ले हीने ब्राऊन बेल्ट कॅटेगिरीमध्ये कास्य पदक मेडल मिळवले तसेच देवांश बुटले यांने मेहरून बेल्ट मध्ये सिल्वर मेडल.
आमीन शेख याने ब्लॅक कॅटेगिरी मध्ये कास्यपदक प्राप्त केले. त्यात विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक प्रकाश मंगरूळकर यांचे मोलाचे योगदान आहे.
तसेच पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या ओकिनावा मार्शल आर्ट व कराटे शोटोकाई इंडिया या संस्थेमार्फत २७ वी नॅशनल चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले त्यात ओम चुंबले यांनी सुवर्णपदक, कुमारी वेदांती रागीट हिने रजत पदक तसेच कुमारी तनवी रामटेके हिने कांस्यपदक प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्याच्या यशाबद्दल माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.