Thursday, April 24, 2025
HomeAcb Trapइव्हिएम विरोधातील उपोषणाची सांगता

इव्हिएम विरोधातील उपोषणाची सांगता

End of hunger strike against EVM

चंद्रपूर :- २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत ईव्हीएम EVM Scam मध्ये गडबड असल्यानेच Congress काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पराभव झाले असा आरोप करीत इव्हिएम विश्वासार्ह नसल्याने निवडणूकीत इव्हिएम मशीन चा वापर बंद करून बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी करीत सचिन रामटेके यांनी दिनांक ६ डिसेंबर पासून मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. End of hunger strike against EVM

दरम्यान त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेसच्या विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला मात्र त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेता आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडून इव्हिएम विरोधातील काँग्रेस तथा इंडिया तथा महाविकास आघाडी च्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होऊन सर्वत्र जनजागृती करण्याचे आवाहन केले. Resolve to build mass movement through signature campaign against EVM

संपूर्ण देशात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, Rahul Gandhi राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, Mallikarjun Kharge महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले Nana Patole तसेच इंडिया तथा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने देशव्यापी, राज्यव्यापी आंदोलन ईव्हीएम विरोधात सुरू असून राज्यात इव्हिएम विरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे, तेव्हा आपली या आंदोलनाला आवश्यकता आहे. हे सरकार, हे प्रशासन हा गुंता लवकर सोडवतील याची शाश्वती नाही. त्यामुळे आपण उपोषणाची सांगता करून ईव्हीएम विरोधातील लढ्याला आणखी बळ द्यावे. जनजागृती करावी असे आवाहन केले त्याला प्रतिसाद देत सचिन रामटेके Sachin Ramteke यांनी धोटे यांच्या हस्ते निंबु पाणी घेऊन आपले उपोषणाची सांगता केली आणि काँग्रेसच्या इव्हिएम विरोधातील स्वाक्षरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन जनआंदोलन उभारण्याचा संकल्प सोडला. तसेच निवडणूकीत इव्हिएम चा वापर बंद करून बॅलेट पेपर वर निवडणूका न घेतल्यास पून्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, सुभाषसिंग गौर, प्रवीण पडवेकर, विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, महिला अध्यक्षा सुनंदा ढोबे, चंदाताई वैरागडे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, राजेश अडुर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular