Friday, January 17, 2025
HomeIndustrialऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिरांचे लोकार्पण

Inauguration of ‘Constituent Temples’ in Industrial Training Institutes

चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जनजागृती होण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. Inauguration of ‘Constituent Temples’

याच अनुषंगाने चंद्रपूर आणि भद्रावती येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण आभासी पद्धतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य प्रणाली हिरामण डहाटे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावती येथील पावरग्रिड चे चीफ जनरल मॅनेजर रजनीश तिवारी, डेप्युटी जनरल मॅनेजर चेतन मेंढे, आयएमसी सदस्य दिलीप राम, माजी जिल्हा परिषद सभापती श्री.वानखडे, संविधान तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ऍड भूपेंद्र रायपुरे, दलित सामाजिक  कार्यकर्ते राहुल सोनटक्के आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बेसिक कॉस्मेटोलॉजीच्या प्रशिक्षणार्थ्यांनी स्वागत गीत  सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारपाल वैशाली रणदिवे यांनी केले तर आभार श्रीमती पूनवटकर  यांनी मानले.

सदर कार्यक्रमात संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी तथा शिल्पनिदेशक सहभागी झाले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular