MLA Kishore Jorgewar welcomed the procession on the occasion of Jashne-Eid-e-Miladunnabi
चंद्रपूर :- जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी Jashne-Eid-e-Miladunnabi निमित्त मकरजी सिरतुल कमेटीच्या वतीने शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे छोटा बाजार चौकात आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी भव्य स्वागत केले. यावेळी आ. जोरगेवार यांनी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मौलाना यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले, तसेच सर्व मुस्लिम बांधवांना जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. कोहिनूर तलावाजवळून निघालेली ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमित झाली. शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने छोटा बाजार चौक येथे मंच उभारण्यात आला होता. शोभायात्रा येथे पोहोचताच मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, अल्पसंख्याक विभागाचे युवा नेते इमरान खान, युवा नेते अमोल शेंडे, अबरार शेख यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.