Appointment of Sunil Dahegaonkar as State Director of FDA
चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एका छोट्याश्या खेडे गावातून येऊन युवा जिल्हाध्यक्ष पदापर्यंत धुरा सांभाळणारे सुनिल दहेगावकर यांची एफडीए च्या महाराष्ट्र राज्य संचालक समिती मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सुनिल दहेगावकर हे या राज्य स्तरिय समितीत कार्य करतील. अन्न सुरक्षा कायदा आणि मानके यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात येते. State Director of FDA
दहेगावकर म्हणाले की, हा सामान्य कार्यकर्त्याचा गौरव आहे. यासाठी मी माननीय मंत्री श्री धर्मरावबाबा आत्राम यांचा कायम ऋणी आहे.
उल्लेखनीय आहे की, ब्रम्हपुरी सारख्या एका टोकावरच्या तालुक्यांतील गावातून दहेगावकर यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरूवात केली. राजकीय पार्श्वभुमी नसताना त्यांनीं राष्ट्रवादीच्या तालुका आणि जिल्हा स्तरावर नेतृत्व केले. या सर्व घडामोडी मध्ये मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. शेवटच्या टोकावरच्या कार्यकर्त्याची दखल घेणारा दूरदृष्टीचा नेता म्हणून जी आत्राम यांची ओळख आहे ती या नियुक्ती मध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या नियुक्ती बद्द्ल दहेगावकर यांचेवर सर्वच स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षावं करण्यात येत आहे.