National membership registration campaign of BJP started in Chandrapur
चंद्रपूर :- राज्यात भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने संघटन मजबूत करण्यासाठी भाजपा संघटन पर्व 2024 राष्ट्रीय सदस्यता नोंदणी अभियानाला राज्यभरात रविवार (दि.5) पासून सुरवात केली आहे. चंद्रपूर महानगरात हे अभियान लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात आ.किशोर जोरगेवार व भाजपा जिल्हाध्यक्ष (श)राहुल पावडे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभियान,संघटन पर्व म्हणून येत्या 15 जानेवारी पर्यंत राबविले जाणार आहे.
चंद्रपूर जिल्हा महानगरच्या वतीने संपूर्ण प्रभागात या अभियानाची सुरुवात करण्यात आली.सकाळी आ जोरगेवार यांनी बाजार मंडळातून या अभियानाला सुरवात केली. या अनुषंगाने नगीनाबाग प्रभागात रविवारी प्रत्येक बुथवर व घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष (श)राहुल पावडे यांनी मतदार बंधू-भगिनींना भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व प्रदान केले.
याप्रसंगी मतदार बंधू भगिनींनी बूथपर्यंत पोहोचून स्वयंस्फूर्तपणे सदस्यता स्वीकारली.अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महानगर पदाधिकाऱ्यांनीं आपापल्या प्रभागातील शक्तीकेंद्र व बुथवर जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी केली.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज यांच्या मार्गदर्शनात सदर सदस्यता अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.ही स्थिती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल पावडे यांनी केले आहे.