Monday, November 4, 2024
HomeCrimeबल्लारपूरात देशी कट्टा, 7 काडतुस व एक नग खाली केस सहित आरोपीला...
spot_img
spot_img

बल्लारपूरात देशी कट्टा, 7 काडतुस व एक नग खाली केस सहित आरोपीला अटक

Accused arrested with country made gun, 7 cartridges and one case in Ballarpur
Action of Local Crime Branch

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर येथून देसी कट्टा, 7 जिवंत काडतूस व एक खाली केस कमरेत बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली.

चंद्रपुर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा. श्री. मुमवका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी दिले होते.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध रित्या हत्यार बाळगणाऱ्यांवर माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते.

सदर मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला LCB गोपनिय माहिती मिळाली की, बल्लारपूर येथील भगतसिंग वार्डातील डब्लुसीएल ग्राउंडवर एक इसम आपले कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे.
यामाहितीवरून पोउपनि. भुरले त्यांच्या टिमसह तात्काळ रवाना होवून सदर इसमास ताब्यात घेवून त्याची तपासणी केली असता, सदर इसमाच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पँटच्या खिशात देशी कट्यात वापरण्यात येणारे 7 नग जीवंत काडतुस व एक नग खाली केस आढळून आले. Action of Local Crime Branch

यावरून आरोपी रोहीत शिवप्रसाद निषाद, वय 24 वर्ष, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर, जि. चंद्रपुर विरूद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या शस्त्र बाळगणेबाबत गुन्हा नोंद केला असून सदर आरोपीला पुढील तपासकामी पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. दिपक डोंगरे, सतिश अवथरे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, गणेश भोयर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular