Taking note of the demands of the Ambedkarite movement
चंद्रपूर :- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा होत असतानाच गांधी चौक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने वातावरण शोकमग्न झाले. रात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी DJ डीजेवरून वाद घालत मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या रविकांत टेंभुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. Murder या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनिकेत गलबले हा युवक गंभीर जखमी झाला.
ही घटना अत्यंत निंदनीय असून सामाजिक सलोख्याला धक्का देणारी ठरली आहे. Bhim Jayanti Rally
स्थानिकांना न्याय द्या अन्यथा…खळखट्याक – मनसे
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रवीण खोब्रागडे व देशक खोब्रागडे यांनी शासन-प्रशासनाकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पालकमंत्री ना. डॉ. अशोक उइके यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. Taking note of the demands of the Ambedkarite movement
बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, महानगरपालिकेचे आयुक्त अकनुरी नरेश, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्यासह टेंभुरकर व गलबले कुटुंबीय उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नवी झेप……..
यावेळी प्रवीण खोब्रागडे यांनी आंबेडकरी समाजाच्या वतीने घटनेची सविस्तर माहिती देत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावर पालकमंत्री डॉ. उइके यांनी पोलिस प्रशासनाला आरोपींवर कडक व कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच, मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. Severe Punishment for the Accused; Justice Will Be Secured for the Victim’s Family – Dr. Ashok Uike
या बैठकीस आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये अशोक फुलझेले, अशोक टेंभरे, किशोर तेलतुंबडे, बंडू ठेंगरे, अशोक निमगडे, प्रतिक डोर्लीकर, ॲड. राजस खोब्रागडे, प्रा. डॉ. टी. डी. कोसे, राजू कीर्तक, रूपेश वाळकोंडे, बुद्धप्रकाश वाघमारे, सुरेश नारनवरे, भाऊराव दुर्योधन, जितेंद्र डोहाणे, धर्मेश निकोसे, विशाल रंगारी, राजकुमार जवादे, सुरेंद्र रायपुरे, हरिदास देवगडे, तेजराज भगत, दिलीप डांगे, शंकर वेलेकर, यशवंत मुंजमकर, राजूभाऊ खोब्रागडे, जमनादास मोटघरे, अनिल खोब्रागडे, केशव रामटेके, प्रेरणा करमरकर, सिद्धार्थ वाघमारे, निर्मला नगराळे, गीता रामटेके, पंचफुला वेल्हेकर, अवंतिका उके, मोनाली पाटील, वैशाली साव, ॲड. पूनम उमरे, किशोर सवाने, शालिनी भगत, हर्षल खोब्रागडे, ज्ञानेश्वर राऊत, प्रणित तोडे, नकुल कांबळे आदींचा समावेश होता.
