Give seven-tenth of forest rights Land Statement to Aheri Tehsildar under the guidance of former ZP President Ajaybhau Kankadalwar
अहेरी :- वनहक्क जमीनीची पट्टे 2012 मध्ये प्राप्त झालेत परंतु आतापर्यंत त्या पट्ट्याचे 12 वर्ष होऊन सुद्धा सातबारा तयार करून न मिळल्याने पीकवलेली कडधान्य सोसायटी महामंडळही घेण्यासाठी तयार नाही तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही योजनाचा लाभ सुद्धा घेता येत नाही. तरी आपल्या स्तरावरून सातबाराची चौकशी करून 12 वर्षा अगोदर मिळालेले वन जमीन पट्टे मिळले असून त्यांची लवकरत लवकर सात बारा तयार करून देण्यात यावा अशी अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात गील्हा गावडे,चमरू आत्राम, मंगो तलांडे, सुरेश मडावी, रामजी आत्राम, गिल्ला आत्राम, बोड्डा आत्राम, मनोज आत्राम, लाली आत्राम, रुपी गावडे, रामजी मडावीसह वेलगूर परिसर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अहेरी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली तहसीलदार अहेरी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विनोद रामटेके, नरेंद्र गर्गम, कार्तिक तोगम सह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.