Tuesday, March 25, 2025
HomeMLAगोंडपिपरीत काँग्रेसचा कार्यकर्ता स्नेहमिलन मेळावा संपन्न

गोंडपिपरीत काँग्रेसचा कार्यकर्ता स्नेहमिलन मेळावा संपन्न

Congress worker friendship meeting concluded in Gondpipari:

चंद्रपूर :- लक्ष्मणराव जगन्नाथ कुंदोजवर महाविद्यालय गोंडपिपरी येथे तालुका काँग्रेस कमेटी गोंडपिपरी तथा तालुका शहर काँग्रेस कमेटी गोंडपिपरी आणि सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्याचे यशस्वी आयोजित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, प्रमुख पाहुणे कृ. उ. बा. स. माजी सभापती सुरेशराव चौधरी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात आ. सुभाष धोटे यांनी लोकसभेत आपल्या विधानसभेच्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इतिहास रचला असून आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पून्हा एकदा आपल्याला परिश्रम घेवून काँग्रेस पक्षाचा झेंडा केवळ राजुरा विधानसभेतच नव्हे तर मुंबई विधानमंडळावर फडकवायचा आहे. Workers are determined to make MLA Subhash Dhote win again.

काँग्रेस पक्ष परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या संरक्षणासाठी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मुल्यांच्या बचावासाठी मैदानात उतरला असून आपले नेते जननायक देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे न डगमगता हुकुमशाही सरकार विरोधात प्रखर लढा देत आहेत. आपल्या या लढाईत एकजुटीने काम करून महाविकास आघाडी भक्कम करायची आहे त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणुक प्रचंड बहुमताने जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागा असा संदेश दिला.

या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमावर, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, नगराध्यक्षा सविता कुळमेथे, शहराध्यक्ष राजु झाडे, शंभुजी येलेकर, नगरसेवक सुरेश चिलनकर, सचिन चींतावार, वनिता वाघमारे, वनिता देवगडे, वनिता वाघाडे, रंजना रमागिरकर, महिला शहराध्यक्ष माधुरी गेडेकर, अनिल झाडे, बबलु कुळमेथे, वासुदेव सातपुते, मारोती झाडे, बारुजी झाडे, दिपक फलके, रफिकभाई शेख, अँड बबलू शेख यासह गोंडपिपरी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular