Friday, March 21, 2025
HomeMaharashtraवर्तमान पिढीने मुक्तीसंग्राम दिनातून सतत प्रेरणा घ्यावी - हंसराज अहीर

वर्तमान पिढीने मुक्तीसंग्राम दिनातून सतत प्रेरणा घ्यावी – हंसराज अहीर

Current generation should continue to draw inspiration from Liberation Day – Hansraj Ahir

चंद्रपूर :– मराठवाडा, हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचा वर्धापन सोहळा हा विजयोत्सव असून या मुक्ती संग्राम दिनाचे स्मरण वर्तमान व भावी पिढयांनी ठेवून अन्याय, अत्याचाराविरूध्द संघर्ष करण्याची वृत्ती अंगीकारावी, देशाला विकासाची गरज असून मा. नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांची दूरदृष्टी व भरीव कर्तृत्वामुळे भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री Hansraj Ahir हसराज अहीर यांनी केले. Flag Hoisting at Korpana on Marathwada Liberation Day

कोरपना येथे दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी भाजपाच्या वतीने आयोजित Marathwada Liberation Day मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापन दिन सोहळाप्रसंगी ध्वजारोहण करून ते उपस्थिताना संबोधित करीत होते. या कार्यक्रमास माजी आमदारद्वय अॅड संजय धोटे, सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे, देवराव भोंगळे, अरूण मस्की, अॅड प्रशांत घरोटे, संजय मुसळे, रमेश मालेकर, सुरेश केंद्रे, शिवाजी सेलोकर, किशोर बावने, अरूण मडावी, निलेश ताजणे, सतिश उपलेंचवार, अमोल आसेकर, राहुल सुयवंशी, जिबने आदी मान्यवराची मंचावर उपस्थिती होती.

आपल्या संबोधनात हंसराज अहीर म्हणाले की, १९४८ मध्ये आजच्या दिवशी झालेल्या निजाम संस्थानच्या मुक्ती दिनाचे महत्व अनन्यसाधारण असून आज आपण खरे स्वातंत्र्य जगतो आहोत. देशात मा नरेंद्र मोदी याच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशाने सर्वच क्षेत्रात विकासाची उत्तुग झेप घेत जगातील ५वी अर्थव्यवस्था म्हणून लौकीक मिळविला आहे. शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्याच्या हिताचे शेकडो निर्णय घेवून या घटकाना आर्थिक सपन्नतेच्या दिशेने नेण्याचे कार्य केंद्र सरकारने केले आहे. याच कार्याचा भाग म्हणून केंद्र व महायुती सरकारच्या काळात जिवती, कोरपना या दुर्गम भागाचा विकास झाला.

किमान आधारभूत मुल्यवाढ करून शेतकऱ्याचे हित जोपासले, खतांच्या किंमती स्थिर राखल्या या क्षेत्रामध्ये केंद्रीय निधीतून सव्वाशे करोड रूपयाची कामे करण्यात यश मिळाल्याचे अहीर यांनी यावेळी सांगितले. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माजी आ. संजय धोटे, सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे व देवराव भोंगळे यानीही समयोचित विचार व्यक्त केले. यावेळी हंसराज अहीर व मान्यवराच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिक, समाजसेवी व शिक्षकवृदांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले व शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकसचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास महिला, पुरूष व आबाल वृध्दांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular