चंद्रपूर :- माता अंबेची भक्ती, गरब्याचा ठेका आणि दांडियाचा उत्साह… अशा जल्लोषपूर्ण वातावरणात चंद्रपूरकरांना नवरात्रोत्सवाची पर्वणी अनुभवता येणार आहे. खेल सेना मंडळाच्या वतीने २५ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत ‘माता अंबे भवानी नवरात्रोत्सव व गरबा-दांडिया स्पर्धा २०२६’ या नऊ दिवसीय विदर्भस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ११ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मूल रोडवरील इंडस्ट्रियल इस्टेट ग्राउंड येथे रंगणार आहे. Garba-Dandiya festivities begin in Chandrapur today
चंद्रपुरात पोलीस फुटबॉल ग्राऊंडवर रंगणार भाऊंचा दांडिया 2026…..
महोत्सवात भक्ती, संगीत, पारंपरिक वेशभूषा आणि गरबा-दांडियाच्या तालावर थिरकण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, विविध स्पर्धांमुळे यंदाचा उत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे. पडोली पोलिसांचा पाठलाग.., 21 लाखांचा मुद्देमाल जप्त…….
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदर्भ समूहाच्या संचालक कल्पना ताई पलीकुंडवार राहणार असून, सोमय्या ग्रुपचे चेअरमन पी. एस. आंबटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तिशीचा पल्ला तपासणी आण सल्ला……
आकर्षक बक्षिसांची लयलूट
गरबा किंग-क्वीन, नवरात्र चॅम्पियन, गरबा प्रिन्स-प्रिन्सेस, गरबा महाराजा-महाराणी, गरबा ग्रुप आणि डांडिया कपल अशा विविध श्रेणींमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धकांसाठी रोख पारितोषिके, गोल्ड कॉइन, दुचाकी, सायकल, मोबाईल फोन आणि अन्य आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय उत्कृष्ट नृत्य, सर्वोत्तम वेशभूषा आणि उत्कृष्ट समूह सादरीकरणासाठीही विशेष गौरव करण्यात येणार आहे. चंद्रपूर ताडोबा जंगल मॅरेथॉन चा शुभारंभ…..
युवकांसाठी दररोज रील स्पर्धा
यंदाच्या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे युवकांसाठी आयोजित करण्यात आलेली दररोजची रील स्पर्धा. या माध्यमातून युवकांना आपले नृत्यकौशल्य, सर्जनशीलता आणि डिजिटल कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. दररोजच्या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, अंतिम फेरीत रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. 348 विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी…..
महोत्सवाचे थेट प्रक्षेपण
चंद्रपुरातील या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद अधिकाधिक प्रेक्षकांना घेता यावा, यासाठी महोत्सवाचे थेट प्रक्षेपण पार्थेश्वर समाचार, MH 24×7 आणि न्यूज प्लस इंडिया या माध्यमांवर करण्यात येणार आहे.
गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासोबतच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा खेल सेना मंडळाचा प्रयत्न आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात चंद्रपूर शहरात भक्ती आणि सांस्कृतिक उत्साहाची रंगत अनुभवायला मिळणार आहे.
या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी राजेश नायडू, शिखा गुप्ता, आकाश नामेवार, तरन्नुम शेख आणि सेजल बेपारी परिश्रम घेत आहेत. खेल सेना मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना व गरबा-दांडिया प्रेमींना या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महोत्सवाची माहिती
-
आयोजक : खेल सेना मंडळ
-
इव्हेंट मॅनेजमेंट : N-KASH Events
-
कालावधी : ११ ते १९ ऑक्टोबर २०२६
-
स्थळ : इंडस्ट्रियल इस्टेट ग्राउंड, मूल रोड, चंद्रपूर
-
संपर्क व नोंदणी : राजेश नायडू – 8669098703
