चंद्रपूर :- मराठा चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात ‘भाऊचा दांडिया २०२६’ या भव्य रास नृत्य व दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Balubhau Dhanorkar यांच्या मुख्य आयोजनाखाली हा उत्सव पार पडणार असून, “रास नृत्याचा घुमणार नवा सूर, उत्साहात थिरकणार संपूर्ण चंद्रपूर” या संकल्पनेसह चंद्रपूरकरांना दांडियाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. ‘Bhaucha Dandiya 2026’ Police Football Ground Chandrapur
हा भव्य उत्सव येत्या ११ ऑक्टोबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७:०० ते १०:०० वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे ठिकाण पोलीस फुटबॉल ग्राउंड, ट्रॅफिक ऑफिसच्या बाजूला, तुकूम रोड, चंद्रपूर हे असणार आहे. नवरात्रीच्या या पावन पर्वात चंद्रपूर आणि परिसरातील सर्व गरबा प्रेमींसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सहभागी होणाऱ्या आणि उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या स्पर्धकांसाठी लाखोंची बक्षीसे व आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

याशिवाय, कार्यक्रमात विशेष रिल्स स्पर्धा, खवय्यांसाठी लाईव्ह फूड स्टॉल्स तसेच प्रेक्षकांना दररोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देखील उपलब्ध असणार आहे.चंद्रपूर शहर व परिसरातील सर्व नागरिक, युवक-युवती आणि गरबा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक खासदार प्रतिभा धानोरकर, मराठा चॅरिटेबल ट्रस्ट व बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
