Farmer seriously injured in tiger attack
चंद्रपूर :- ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणी) येथील शेतकरी गोवर्धन डांगे सकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांचेवर जबर हल्ला यात शेतकरी डांगे गंभीर जखमी झाले. Tiger attack
मानव वन्यजीव संघर्षाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, यात बहुतांश शेतकरी वन्यजीवांचे बळी ठरत आहेत.
अशीच एक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणी) येथे घडली आहे, शेतकरी गोवर्धन डांगे हे सकाळी 7 वाजता शेतात धान पिकाला पाणी देत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने डांगे यांच्यावर हल्ला चढवीला दरम्यान दोघात झुंज झाली, डांगे यांनी समयसूचकता साधत शेजारील विहिरीत आश्रय घेतला आणि मुलाला फोन केला त्यांचा मुलगा गावकऱ्यांना सोबत घेऊन आल्याने वाघाने पळ काढला, यात सुदैवाने डांगे वाघाचे भक्ष ठरू शकले नाही.
शेतकरी डांगे गंभीर जखमी झाल्यामुळे ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
