Tuesday, November 12, 2024
HomeMaharashtraमनपा अनुकंपधारकांना सेवेत रुजू करा आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन
spot_img
spot_img

मनपा अनुकंपधारकांना सेवेत रुजू करा आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन

Engage municipal sympathizers in service
Statement to MLA Kishore Jorgewar
Take service or fast from 14th August

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका कृती समितीने शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड.निमेश मानकर यांचे नेतृत्वात आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय बाबत निवेदन देण्यात आले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील सर्व अनुकंप धारकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देवून त्यांची वेळोवेळी भेट घेतली परंतु आयुक्त यांनी सर्व अनुकंपाधारकांना मराठा आरक्षणा बिंदुनामावली आरक्षीत झाली नसल्यामुळे अनुकंप भरतीला स्थगिती दिली आहे असे सांगितले. तसेच महानगरपालिकेच्या आस्थापना येथील संबंधित बाबुला विचारणा केली असता त्यांनी सुध्दा 3 ते 4 जागा शासनाच्या धोरणाप्रमाणे भरण्याचे सांगितले. ही सर्व आश्वासने अनुकंपधारकांना 2022 ते 2024 या दरम्यान देण्यात आली, मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले .त्यामुळे प्रतिक्षा यादीत असणाऱ्या अनुकंपाधारकांवर व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.

शासन निर्णयानुसार सरळसेवा कोठ्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 टक्के प्रमाणे पदभरती होत आहे. मात्र सदरील शासन निर्णयाप्रमाणे सामायिक प्रतिक्षासुची मधील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील मोजकेच अनुकंपधारकांना नियुक्ती मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्षा सुचीमध्ये सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यास 10 ते 12 वर्षाचा कालावधी लागत असल्याने अनुकंपाधारक वयाच्या अटीमध्ये बाद होत आहोत. शासन निर्णयामध्ये बदल करुन त्यामध्ये सरळसेवेने रिक्त होणाऱ्या पदाऐवजी सद्यस्थितीत सरळसेवेचे रिक्त असलेल्या एकुण पदाच्या 20 टक्के पदावर असा बदल केल्यास अनुकंपा प्रतिक्षा यादी कमी होईल. जर प्रशासन/ शासनाने अनुकंपा धारकांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर अनुकंपाधारकांकडे उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने आम्ही सर्व अनुकंपाधारक दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून मनपा समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत.

त्यामुळे या निवदेनावर प्रशासन व शासनाने गांभिर्याने लक्ष देवून मागण्या मान्य कराव्या अशी सर्व अनुकंप धारकांनी केली.

अनुकंप धारकांच्या प्रमुख मागण्या ‘ड’ वर्गातील सर्व अनुकंप धरकांना एक विशेष बाब म्हणून शासन सेवेत तात्काळ सामावून घेण्यात यावे, सद्या स्थितीत रिक्त असलेल्या एकुण पदाच्या 20 टक्के वर्ग क व वर्ग ‘ड’ च्या अनुकंप धारकाची पद भरती करण्यात यावी, 23/8/2008 चा शासन निर्णय 50 टक्के, 25 टक्के, 25 टक्के प्रमाणे 100 टक्के अनुकंप पदभरती करावी.

आमदार महोदय यांनी या विषयावर लवकरच मुख्यमंत्र्यांशी भेट घेवून तोडगा काढू असे आश्र्वासन दिले.

निवेदन देताना शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड. निमेश मानकर तसेच अनुकंपाधारक सुजय घडसे, संतोष सुभाष बोरकर, आकाश मधुकर करपे, ओमदेव दिनकर निखाते, शुभम मोरेश्वर गहुकर, अजय अनिल रामटेके, संगीता खेमराज दुर्गे उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular