Chandrapur city police midnight blockade: 1200 kg of beef worth 13 lakh seized with 5 accused
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात विक्री करिता गोमांसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक ला चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नाकाबंदी करून बर्फच्या लादीमध्ये ठेवलेले चक्क 1270 किलो गोंमांस जप्त करीत 5 आरोपीना अटक करण्यात आली यात एकूण 13,000,00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 1200 kg of beef worth 13 lakh seized with 5 accused
चंद्रपूर शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असतांना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एका ट्रॅकने गोवंश तस्करी किंवा गोमांसाची वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक 4 ऑगस्ट पहाटे 1 वाजता चोराळा मार्गांवरील , शाही इदगाह जवळ बॅरिगेट्स लावून नाकाबंदी करीत ट्रक क्र. टी एस 12 यु सी 3236 ला थांबवून ट्रॅकची पाहणी केली असता बर्फच्या लादीत मांस व अवयवांचा ढीग आढळून आला. Chandrapur city police midnight blockade
यावेळी वाहणात चालक मोहम्मद उमर मोहम्मद चांद, वय 38 वर्षे, रा. जलपल्ली, ता. राजंदानगर, जिल्हा आर .आर . तेलंगणा यासोबतच ट्रक मध्ये इतर 4 प्रवासी साजीद अब्दुल रज्जाक कुरेशी, वय 32 वर्षे, धंदा मांस विकी, रा. रयतवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, चंद्रपूर, सध्या राहणार बिनबा गेट रहमतनगर, चंद्रपूर, निजाम हमीद शेख, वय 20 वर्षे, रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर, असरार अहमद अब्रार अहमद, वय 19 वर्षे, रा. काला पथर बिलाल नगर, हैदराबाद, ता.जि. हैदराबाद, तेलंगाना व अब्रार अहमद मोहम्मद रूकनोद्दीन, वय 40 वर्षे, रा.काला पथर बिलाल नगर, हैदराबाद, ता.जि. हैदराबाद, तेलंगाना या सर्व आरोपीसह वाहन चंद्रपूर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले. Chandrapur City Police DB Squd
पासुवैध्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून सदर मांसाची तपासणी केली असता गोवंश मांस असल्याचे सिद्ध झाले यावरून ट्रक क्र. टी एस 12 यु सी 3236 जप्त करीत वाहन चालक व इतर चार जनांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. यावेळी एकूण 13,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Crime
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली, पुलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे, पुलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, इम्रान खान, रूपेश पराते, संतोष कावळे, मंगेश मालेकर, शाहबाज सैयद, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे , राहुल चिताड़े यांनी केली.