Friday, April 17, 2026
HomeElectionअनिल रामटेके यांची जंगी प्रचार रॅली

अनिल रामटेके यांची जंगी प्रचार रॅली

election atmosphere heated up with Anil Ramteke’s campaign rally

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत बाबूपेठ प्रभाग क्रमांक १७ मधून बहुजन समाज पक्षाच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणारे अनिल रामटेके यांनी आज ईश्वरानी दोम्मट आणि रजत मसराम या आपल्या इतर दोन उमेदवारांसह भव्य प्रचार रॅली काढत प्रभागात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्ते व समर्थकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. Anil Ramteke’s campaign rally

रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना अनिल रामटेके म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग हा सर्वधर्म समभाव जपणारा, विविध समाजघटकांचे वास्तव असलेला प्रभाग आहे. मी नगरसेवक असताना कोणताही भेदभाव न करता सर्व समाजातील नागरिकांची कामे मनोभावे केली. त्यामुळेच मी केवळ नगरसेवक न राहता जनतेचा जनसेवक झालो.” Chandrapur Municipal Elections 2026

ते पुढे म्हणाले, “आंबेडकर वॉर्डमध्ये एकेकाळी रस्त्यांवर खड्डेच खड्डे होते. पिण्याच्या पाण्यासाठी महिला भगिनींना मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र जनतेच्या आशीर्वादाने खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती केली आणि पिण्याच्या पाण्याची भक्कम व्यवस्था उभी केली.”
काँग्रेस पक्षावर टीका करताना रामटेके म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने भंडारा येथून पराभूत केले होते. काँग्रेस पक्ष म्हणजे जळते घर आहे, असे स्वतः बाबासाहेबांनी सांगितले होते,” असा आरोप त्यांनी केला.

याचवेळी त्यांनी आमदार जोरगेवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. “चंद्रपूर शहरात आजवर जो काही विकास झाला आहे, तो फक्त माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातच झाला,” असा दावा त्यांनी यावेळी केला
महानगरपालिकेच्या कारभारावर भाष्य करताना ते म्हणाले, “शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेत अनुभवी नगरसेवकाची गरज आहे. जो महापौर व आयुक्तांसमोर जनतेचे प्रश्न ठामपणे मांडेल, गरज पडल्यास टेबल ठोकून काम करून घेईल, असा खंबीर प्रतिनिधी हवा.”

प्रभागातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वार्डाचा विकास करण्याचा माझा ध्यास असून, परिसरात एक मोठा बगीचा निर्माण करणार असल्याचेही यावेळी माणस सांगितला.

या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक १७ मधील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून, आगामी निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular