Thursday, October 22, 2026
HomeCrimeसमतानगर येथे रामनगर पोलिसांचा छापा; ११ जण ताब्यात

समतानगर येथे रामनगर पोलिसांचा छापा; ११ जण ताब्यात

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील समतानगर येथे घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत सुरू असलेल्या जुगारावर रामनगर पोलिसांनी छापा टाकत ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.५० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Ramnagar Police Raid a Gambling Den

रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार खेळणाऱ्यांसह जुगार खेळविणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे समतानगर, तुकुम येथील राजेंद्र सोमाजी रायपुरे याच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळविली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असल्याचे आढळून आलेल्या ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १२,०६,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत शैलेश गंगाधर पोडल्लीवार (वय ५०, व्यवसाय शिक्षक, जिल्हा परिषद), रंजु कालीदास दुर्योधन (वय ५४), इंद्रजीत सोमाजी रायपुरे (वय ५८), राजेंद्र सोमाजी रायपुरे (वय ५३), राजेश्वर पोचम दुर्गे (वय ४८), ललित ऊर्फ क्षितीज बाकाराम देशपांडे (वय ४८), अनिल यशवंत बनकर (वय ६५), किशोर वसंता पारखी (वय ४९), सुनील रामचंद्र नगराळे (वय ६३), संजु खुशाल दुर्योधन (वय ३८) आणि विजय गजानन रायपुरे (वय ५५) यांचा समावेश आहे. यातील काही जण डब्ल्यूसीएलमध्ये कार्यरत असून काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.

या सर्वांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, मंगेश शेंडे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी केली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular