Monday, October 26, 2026
HomeAgricultureदुष्काळात डीपीचा फटका; शेतकऱ्यांची पिके धोक्यात

दुष्काळात डीपीचा फटका; शेतकऱ्यांची पिके धोक्यात

पिपरी दीक्षित – चेक घोसरीदरम्यान रोहित्र वारंवार जळत असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर; महावितरणने तातडीने दखल घेण्याची मागणी

चंद्रपूर :- यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मूल तालुक्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिके जगविण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता वारंवार जळणाऱ्या विद्युत रोहित्राचा (डीपी) प्रश्न उभा ठाकला आहे. पिपरी दीक्षित आणि चेक घोसरी या गावांच्या मधोमध असलेल्या डीपीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. Drought compounded by DP (distribution transformer) failure

यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतातील पिकांना पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे मोटारपंपाची सुविधा आहे, ते विद्युत पुरवठ्याच्या मदतीने पिकांना पाणी देऊन ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, संबंधित डीपी वारंवार जळत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो आणि सिंचनाचे काम ठप्प पडते. परिणामी, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. farmers’ crops at risk

शेतकरी रात्रीच्या वेळी जागरण करून शेतातील पिकांना पाणी देण्याचे काम करीत आहेत. मात्र, डीपीमध्ये बिघाड झाल्यानंतर वीजपुरवठाच उपलब्ध होत नसल्याने मोटारपंप चालविणे अशक्य होते. वेळेवर पाणी न मिळाल्यास पिके वाळण्याची आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. Msedcl

महावितरणने तातडीने लक्ष देण्याची मागणी

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी, संबंधित डीपीची तातडीने दुरुस्ती करावी तसेच भविष्यात वारंवार बिघाड होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पिपरी दीक्षित आणि चेक घोसरी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

“सदर भागातील रोहित्राची क्षमता २५ केव्ही असल्याने त्यावर विद्युत भार अधिक पडतो. परिणामी, येथे रोहित्र वारंवार जळण्याच्या घटना घडतात. ही समस्या लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी ६३ केव्ही क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच येथे नवीन रोहित्र बसविण्यात येणार असून, त्यामुळे परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.”

— शिवप्रसाद चौधरी
वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण विभाग

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular