Constituent Jagar Yatra – People’s leader Sudhirbhau Mungantiwar’s special presence
चंद्रपूर :- संविधान जागर यात्रा समिती महाराष्ट्रद्वारे आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री लोकनेता Minister Sudhir Mungantiwar सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती होती. Constitution awareness rally
कार्यक्रमादरम्यान, ब्रिजभूषण पाझारे माजी समाज कल्याण सभापती, यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भारतीय संविधान भेट दिले. हा सोहळा संविधानाच्या मूल्यांबद्दल आदर आणि अभिमान व्यक्त करण्याचा एक महत्त्वपूर्ण क्षण ठरला. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत संविधानाच्या पालनाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली आणि संत जगनाडे महाराज सभागृह, मुल रोड, चंद्रपूर येथे समारोप झाला. उपस्थित मान्यवरांनी संविधान जागर यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आपल्या योगदानाची प्रतिज्ञा केली.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान जागर यात्रा 2024 चे “सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर मुंबई” पर्यंत आयोजन करण्यात आले असून सदरील यात्रा ” महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून 6500 किलोमिटरचा प्रवास करून संविधानाचा जागर करत आहे. दिनांक 27/08/2024 रोजी ही संविधान जागर यात्रा चंद्रपूर शहरात आली असता मोठ्या जल्लोषात या यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चंद्रपूर शहरातील संताजी जगनाडे सभागृह येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.
सदरयात्रेचे राज्य संयोजक आकाश अंभोरे, नागसेन पुंडगे, संविधानाचे अभ्यासक ॲड.वाल्मिकतात्या निकाळजे, डॉ.आंबेडकर फाऊंडेशन नवी दिल्ली संचालक योजना ठोकळे, स्नेहा भालेराव, बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष विजय गव्हाळे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड, जयभीम आर्मीचे संतोष गवळी, अशोक गायकवाड, यांची उपस्थिती होती. Constituent Jagar Yatra
सदरील रॅली मध्ये महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानातील योगदान आणि कायदेविषयक जनजागृती करण्यात येत असून त्यात अनेक संविधान अभ्यासक मार्गदर्शन करत आहेत. या कार्यक्रमास चंद्रपूर शहरांमधील नागरिक आणि संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर शहरात या कार्यक्रमाचे आयोजन संविधान जागर समिती, चंद्रपूर चे संयोजक मान श्री बिजभुषनजी पाझारे, सह संयोजक राजेश थुल, सविता कांबळे, गौतम निमगडे, विजय वानखेडे, विलास टेंभूर्णे, जयश्री ताई जुमडे, शीतल गुरणुळे, रेनुकाताई घोडेस्वार, कुंदन मेश्राम, नूतन मेश्राम, वनिता डुकरे, शीला चव्हान, संगीता खांडेकर, रणजित येले, वंदना तिखे, राहुल काळे, मनोज गेडाम, राकेश आत्राम, राहुल नगराळे यांनी केले.