Thursday, April 24, 2025
HomeMaharashtraबाबुपेठ उड्डाण पुलाचे महिनाभरात होणार काम पूर्ण

बाबुपेठ उड्डाण पुलाचे महिनाभरात होणार काम पूर्ण

Final concreting of Babupeth railway flyover completed, inspected by MLA Kishore Jorgewar

चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार यांनी ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. बुधवारी त्यांनी शेवटच्या काँक्रीटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले.

यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, मनपा शहर अभियंता विजय बोरिकर, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, अतिरिक्त सहायक आयुक्त बोबाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता जावळे आदींची उपस्थिती होती. बाबुपेठ उड्डाणंपुलाचे काम अंतिम टप्प्यात

बाबुपेठकरांची अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्णत्वास यावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. काम शेवटच्या टप्प्यात असताना निधीअभावी काम रखडले होते. या निधीची व्यवस्था करण्यासाठी आमदार जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी सतत प्रयत्न करून ५ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. चंद्रपुरात काळे फुगे दाखवीत राष्ट्रवादी चे निषेध आंदोलन

सदर निधी प्राप्त होताच पुलाच्या बांधकामाला गती मिळाली असून, येथे रंगकाम आणि विद्युत रोषणाई पोल लावण्यात आले आहेत. उर्वरित पुलावरील शेवटचे काँक्रीटीकरणही आज पूर्ण करण्यात आले आहे. नियमानुसार पुढील काही दिवस हे काँक्रीटीकरण असेच ठेवण्यात येणार आहे; तोपर्यंत उर्वरित पूरक कामे पूर्ण केली जाणार आहेत. Babupeth Flyover

दरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी काँक्रीटीकरणाबाबतची माहिती घेतली आणि आवश्यक निधी मिळवून दिल्यामुळे काम अपेक्षित गतीने सुरू असल्याचे सांगितले. ही गती मंदावणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. युद्धपातळीवर काम करून पुल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचेही निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी बाबुपेठ येथील नागरिकांसह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular