Friday, March 21, 2025
HomeMaharashtraसायकलने 18000 किलोमीटर चारधाम प्रवास करणाऱ्या मयुरचा डॉ. विश्वास झाडे यांनी केला...

सायकलने 18000 किलोमीटर चारधाम प्रवास करणाऱ्या मयुरचा डॉ. विश्वास झाडे यांनी केला सत्कार…

Iron Man Dr. Zade felicitated Mayur who traveled 18000 km round trip by cycle.

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील पौंभुर्णा तालुक्यामध्ये राहणारा घनोटी या छोट्या गावातील 23 वर्षीय मयूर देऊरमले यानी 18000 किलोमीटर सायकलने प्रवास करून बारा ज्योतिर्लिंग व चार धाम यात्रा पूर्ण करून पाच महिन्यांमध्ये एक वेगळाच विक्रम स्थापित केला,

चंद्रपूर येथे स्थानिक वरोरा नाका चौक मध्ये तो आला असता, त्या ठिकाणी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष, जीवन ज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे व त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचे स्वागत व सत्कार केले. 

डॉ. विश्वास झाडे भारतातल्या लद्दाख, मुंबई, हैद्राबाद, गोवा, बंगलोर, नागपूर व इतर अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सुद्धा सहभागी झाले होते, तसेच चंद्रपुरातील पहिले आयरन मॅन Iron Man म्हणून पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना शारीरिक खेळात आवड आहेच हे दिसून येते. खेळातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ होते असे त्यांनी म्हटले आहे.

मयूरचा हा सायकल प्रवास नक्कीच सर्व युवकांना प्रेरणादायी ठरेल, असे डॉक्टर विश्वास झाडे यांनी सांगितले. Iron Man Dr. Zade felicitated Mayur who traveled 18000 km round trip by cycle.

यावेळी छायाचित्रकार देवानंद साखरकर, प्राध्यापक श्याम हेडाऊ, सामाजिक कार्यकर्ते अमर रामटेके, दिक्षांत बेले व उपस्थित मित्रपरिवाराने त्याचे स्वागत केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular